IRA
Tuesday, 26 January 2016
Thursday, 5 November 2015
विचित्र स्वप्न
. एकदा साताऱ्यात आणि मुंबईत खूप मोठा भुकंप आला
कबू चं आणि माझं घर तुटलं
मग आम्ही पुण्यात घर बांधलं
आत्या घर शोधत होती
तेंव्हा आत्याचा एक ड्रायव्हर होता
तो म्हणाला तुम्ही घर शोधा
तोपर्यंत मी बाळाला माझ्या गावी नेतो
कबू गेला नगरला
मग आत्याने पुण्यात घर घेतलं
पण ती विसरली
कबू कोणत्या गावी गेला
मग आम्ही ड्रायवर ला फोन केला
मग आम्हाला कळलं की तो नगरला आहे .
मी आणि आजोबा सायकलवरून गेलो .
ड्रायवरच्या झोपडीजवळ पोचल्यावर
मला तिथे हसतमुखत खेळणारा कबू दिसला
तेवढयात आजोबानी वाघाची डरकाळी ऐकली
मग आम्ही परतलो .
आल्यावर मी रडतच बसले
मला वाटलं वाघ आला
आता कबू चं काय होणार ?
म्हणून मी आणि आजोबा दुसऱ्या दिवशी गेलों
जवळ आल्यावर सायकलची चेन निघाली
तेवढयात
कबू दिद्दी ! करत पळत आला
आणि आम्ही घरी परतलो
नंतर ड्रायवरच आला
आणि म्हणाला
तुमचे बाळ आमच्याकडून हरवलं
मग आत्यानं ड्रायवर ला सांगितलं
की असं सगळं घडलं आहे .
आणि हे सगळं कधी घडलं ?
स्वप्नात ...
इरा मंडपे
Sunday, 25 October 2015
काळू कुत्रा
एके दिवशी कॉलनीत एक कुत्र्याचं सुंदर दालमेशन पिल्लू आलं
ते अनाथ होतं . सगळे बाहेर खेळत होते .
तेंव्हा मी एकटीच आत खेळत होते .
तेंव्हा खेळता खेळता कुणाला तरी ते दिसलं .
एकटंच कोपऱ्यात रडत बसलेलं ते पिल्लू होतं .
मी बाहेर आले .
आणि म्हणाले आपण ह्याला पाळू या का ?
मग कोणीतरी मध्येच म्हणालं , " हो हो बिचारं रडतंय "
मग पहीले त्याला खायला काहीतरी दिलं .
मग त्याच्या बरोबर आम्ही खूप खेळलो .
मग ठेवायचं कुठं ?
तर एका घराशेजारच्या छोटया शा बागेत ठेवलं
तिथे ते झोपलं .
एकदा तर आम्ही त्याला अंघोळ घातली .
ते बिचारे थंडीने कुडकुडत होतं
मग त्याला पांगरूण घातले .
आणि झोपवलं . मग त्याला कुणी उठवू नये म्हणून काही जण तिथेच थांबली .
आणि काही घरी गेली .
संध्याकाळ झाली पिलू उठलं .
मग प्रश्न पडला नाव काय ठेवायचं ?
मग आम्ही नाव ठेवलं ब्लॅकी .
ब्लॅकी कॉलनीतला पहिला कुत्रा .
एके दिवशी कुणीतरी त्याला पळवून नेलं .
ग्हणून मी खूप रडले .
मग सईदिदीनं त्याला शोधून सायकलवर आणलं .
मग सगळे ओरडले . ये ! ब्लॅकी आला .
मग आम्ही त्याच्या बरोबर खूप खेळ लो .
पण मग नंतर कोणीतरी परत त्याला नेलं .
मग दीदी परत गेली पण तो सापडला नाही .
मग खूप वर्ष गेली .
एक मोठं कुत्रं आमच्या दारात आलं .
मला वाटलं ते ब्लॅकी आहे .
पण ब्लॅकी डालमेशन होता .
ते कुत्रं कारवान होतं .
संध्याकाळ झाली ते तिथच राहीलं .
बाबा आले आणि त्यांना ते त्यांच्या आधीच्या कुत्र्यासारखं वाटलं
पण ते साप चावून मेलं होतं .
त्यांनी त्याला पाळलं .
हळूहळू ते हुशार होत गेलं त्यांनी त्याचं नाव ठेवलं काळू .
पण मला ब्लॅकीची आठवण येत होती
म्हणून मी त्याला ब्लॅकी म्हणत राहीले .
आणि अजूनही ते आमच लाडकं कुत्र राहीलं .
ही सत्य घटणा आहे !
-इरा मंडपे
Sunday, 18 October 2015
तोत्तोचान
एके दिवशी दिदी एकटीच खेळत होती .
तेव्हा मुल्ला काका पुण्यातून साताऱ्यात येताना त्याना एक शिकारी दिसला
त्याच्या हातात एक गुबगुबीत छोटंसं पोपटाचं पिलू होतं
त्यांनी विचारलं तू हे पिलू का घेऊन चालला आहेस ?
शिकारी म्हणाला भाजून खाण्यासाठी
मग ते म्हणाले ह्याला खाऊ नका
मी ते विकत घेतो .
मग ते पिल्लू भेदरलं होतं
घरी आल्यावर ते म्हणाले सई !
हे बघ मी काय आणलय
दिदी आनंदात पळत गेली .
तेंव्हा ती साडेतीन वर्षांची होती .
तैन्हा मम्मी दिदीला तोत्तोचान गोष्ट सांगायची
तिला ती गोष्ट खूप आवडायची
त्यामुळे दिदीने त्याचे नाव तोत्तो चान ठेवलं .
नंतर तो कधीच बोलायचा नाही .
मग सगळे त्याला मुका पोपट म्हणायचे
पण एकदा तोतो चानला मिरची खायला दिली .
मग एकदम तो बोललासई सई !
बरेच दिवस गेले
तोतो चान घरात रमला ..
दिदीला आई जे काही खायला देईल
त्यातलं अर्ध नेहमी तोत्तो चानच्या प्लेटमध्ये असायचं
आईने दिदीला छोटया डब्यामध्ये गोट्या टाकून एक दोन तीन शिकवायची
मग गोटी घरंगळत गेली की तोतो चान चोचीत धरून ती आणायचा
आणि एक मोठी गोटी होती ती घरंगळत जायची
तेंव्हा तोतो चानला ती चोचीत धरता येत नसे .
मग तो ती गोटी ढकलत आणायचा .
त्याला ते खूप आवडत .
आई किचनमध्ये काम करत असताना
तो यायचा आणि गोटया गोटया करायचा .
तो खूप हुशार होता .
एकदा त्याच्या पिंजऱ्यात उंदीर आला
मग तो पिंजऱ्याच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर आला .
आणि कडी लावली .
त्याला क्रीमची बिस्कीट आवडायची
एकदा तो उडून गेला
नंतर काही महिन्यांनी तो परत घरी पिलाना घेऊन आला
आणि घराशेजारच्या झाडावर त्याच्या कुटुंबासोबत राहीला
- इरा मंडपे
Tuesday, 13 October 2015
Sunday, 11 October 2015
कथा
एका पडक्या दारापाठी एक सागवानाचे झाड होते .
ते असं सुंदर हिरव्यागार पानांचं होतं
त्याच्यावर गोजिरी पाखरं राहात होती .
पण काही वर्षांनी तिथे एक ख्रिश्चनांचं स्मशान तयार झालं
एके दिवशी चक्रीवादळ आलं .
त्या झाडाची सगळी पाने गळून पडली .
झाड पूर्ण काळवंडलेलं झालं होतं .
किती भितीदायक अवस्था झाली होती ती
पडकेदार दणादणा आपटून भितीदायक आवाज काढत होतं
बिचाऱ्या झाडाची काय अवस्था झाली असेल ?
काय वाटत असेल त्याला ?
तसं सांगायचं तर त्याचा शंभरावा वाढदिवस पुढच्या महिन्यातच होता .
नंतर दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला .
चौथ्या दिवशी
त्या झाडावर गोजिरी पाखरं येऊन बसली .
तिथे त्यांनी घरटी बांधली .
झाड हसतमुखत त्यांच्याबरोबर रहात होतं .
पण कालच शंभरावा वाढदिवस झाला होता
त्याला मरावसंच वाटत नव्हतं .
पण मेल्यावरही झाडाला जगल्यासारखं वाटत होतं
त्यामुळे खूप दिवसांनी तिथेच त्याच जागी
एक इवलेसे रोप उगवून आले
तोच त्याचा पुढचा जन्म
असे हे झाडाचे आयुष्य
धन्यवाद
इरा मंडपे